दयालसिंग चव्हाण
संग्रामपूर /- राज्य पुरस्कृत कापूस/सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास प्रकल्प विशेष कृती योजने अंतर्गत 750 बॅटरी संचलित फवारणी पंपाचे वितरण माजी मंत्री जळगांव जामोद मतदार संघाचे विध्यमान आमदार डॉ.संजय कुटे यांच्याहस्ते करण्यात आले.
संग्रामपूर तालुक्यातील जळगांव जामोद – वरवट बकाल रस्त्यावरील शेतकरी उद्योग समूह जिनिंग येथे पंप वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे प्रमूख उपस्थितीत त्यांच्या हस्ते संग्रामपूर कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी फवारणी पंपचे लाभार्थी 750 पात्र शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी आमदार डॉ.कुटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
राज्य पुरस्कृत कापूस/सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास प्रकल्प विशेष कृती योजने अंतर्गत बॅटरी संचलित फवारणी पंपाचे वितरण आमदार डॉ.संजय कुटे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ढगे यांनी केले. सदर कार्यक्रमास उपविभागीय कृषि अधिकारी व्यवहारे, तंत्र अधिकारी सुरडकर, तालुका कृषि अधिकारी संग्रामपूर अमोल बनसोडे तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालय संग्रामपूरचे सर्व कर्मचारी व लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी श्री कदम यांनी केले.

