*स्वामी रामभारती महाराज यांच्या शुभहस्ते आमदार डॉ.संजय कुटे यांच्या उपस्थित चांगेफळ येथील 2 कोटी रुपयांच्या मंगलभवन बांधकामाचा भूमीपूजन …!*
जळगाव जामोद तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान सखारामपुर येथील अडीच कोटी रूपये खर्चाच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन शनिवार 12 ऑक्टोंबर 2024 सकाळी 9 वाजता हभप गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुरकर श्री संत सखाराम महाराज संस्थान, इलोरा सखारामपुर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉ. संजय कुटे होते. तसेच श्री रामभारती महाराज आश्रम येथे 2 कोटी रूपये खर्चाच्या मंगल भवन बांधकामाचे भूमिपूजन रविवार 13 ऑक्टोंबर 2024 सकाळी 8 वाजता श्री स्वामी रामभारती महाराज सन्यास आश्रम, चांगेफळ ता. संग्रामपुर यांच्याहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. डॉ. संजय कुटे होते. उपरोक्त दोन्ही कार्यक्रमाला भाविक, ग्रामस्थ, यासह डॉ गणेश दातीर जिल्हा सरचिटणीस भाजपा, प्रकाश वाघ भाजपा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद, रंगराव देशमुख, गजानन सरोदे, रमेश दळवी, परीक्षित ठाकरे, बंडू पाटील माजी जि प सदस्य, गुणवंता खोडके, राजेश मुयाडे, सुधाकर शेजोळे, गजानन ठाकरे, दत्ता मारोडे, अमोल कोलकार, मंगेश काळेमेघ, मोहन आगरकार सह महायुतीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

