तलाठी व कोतवाल पदाचे नाव बदललले ….तलाठी बनले “ग्राम महसूल अधिकारी” तर कोतवाल “महसूल सेवक” …!

0
186

तलाठी व कोतवाल पदाचे नाव बदललले ….तलाठी बनले “ग्राम महसूल अधिकारी” तर कोतवाल “महसूल सेवक” …!

बुलढाणा- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तलाठी व कोतवाल पदाचे नाव बदलण्यात आले आहे. तलाठी यांना यापुढे “ग्राम महसूल अधिकारी” म्हणून ओळखले जाईल तर कोतवाल यांना “महसूल सेवक” म्हणून संबोधले जाणार आहे. नवीन प्रकाशित शासन निर्णयानुसार आता तलाठी पदास ग्राम महसूल अधिकारी या नावाने संबोधले जाणार आहे.

तलाठी संवर्गाच्या पदनामात आता बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे नवे पदनाम त्यांना देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महसुल विभागाने १४ ऑक्टोंबर रोजी तसे परिपत्रक जारी केले. राज्याचे सहसचिव संजय बनकर यांनी तसा आदेश निर्गमित केला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार तलाठी या पदाची वेतन श्रेणी एस-८ नुसार २५५०० ते ८१ १०० अशी आहे. तलाठी या पदनामात बदल केल्यामुळे या वेतन स्तरामुळे नवीन वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही. पदनाम बदलानंतर सध्याच्या गट क संवर्गामध्ये कोणताही बदल होणार नाही वा गट बदला संदर्भातील कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच मानधन तत्वावर असलेल्या कोतवालांची विनंती लक्षात घेऊन त्यांचेही पदनामात बदल करून त्यांचे महसूल सेवक असे पदनाम करण्यात आले आहे. जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा त्यास गोळा कराव्या लागतात. कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाठयास करावे लागते. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्यात आले आहे.

राज्यातील कोतवालांनी मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींना केलेल्या विविध मागण्यांमध्ये कोतवाल पदाचे पदनाम बदलून “महसूल सेवक” करावे, अशी मागणी केलेली होती. राज्य शासनाच्या समितीने कोतवाल पद हे ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असल्याने कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. त्यानुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करण्यात आले आहे.