भाजपाची 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या तीन आमदाराला पुन्हा संधी..! मलकापूरात अद्याप भाजपाचा उमेदवार जाहिर झाला नाही ?

0
57

भाजपाची 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या तीन आमदाराला पुन्हा संधी..! मलकापूरात अद्याप भाजपाचा उमेदवार जाहिर झाला नाही ?

दयालसिंग चव्हाण
बुलढाणा/- गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीन उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यात आजच्या पहिल्या यादीत जळगांव जमोद विद्यमान आमदार डॉ.संजय कुटे , आकाश फुंडकर, श्वेता महाले यांना पुन्हा संधी देत उमेदवारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहिर करण्यात आली. यामध्ये अपेक्षेनूसारच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमधून डॉ. संजय कुटे, खामगावमधून अॅड. आकाशदादा फुंडकर तर चिखली मतदार संघातून सौ. श्वेताताई महाले या तिघांची नावे जाहिर झाले आहे. तर मलकापूर मतदार संघात अद्याप भाजपाचा उमेदवार जाहिर झाला नाही.उमेदवार कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ? जाहिर झालेल्या उमेदवारांच्या कार्याकत्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.