बुलडाणा कलेक्टर डॉ. किरण पाटील आणि ॲाब्झर्वर नवनीत कुमार यांची जळगांव जामोद मतदार संघाला भेट…! दोन दिवसात 27 व्यक्तींनी 52 अर्ज घेतले , दुसऱ्यादिवशी एकही अर्ज दाखल झाले नाही..! सविस्तर वाचा….
जळगांव जमोद – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. 23 ऑक्टोबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जळगांव जामोद येथील नवीन प्रशासकीय इमारत उपविभागीय महसूल कार्यलय जळगांव जामोद मतदारसंघाला भेट देऊन मतदान केंद्रातील सोयीसुविधाची पाहणी करुन नामांकन अर्ज मिळणाऱ्या कक्षाला भेट दिली. विधानसभा मतदार संघ विभागीय कार्यालय येथे भेट देवून निवडणूक अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. व निवडणूक संदर्भात सर्व विभागाची पाहणी करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. व निवडणूक शांततेत सुव्यवस्थीत पार पडावी. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. सदर पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच त्यानंतर निवडणूक निरिक्षक नवनीत कुमार यांनी सुद्धा भेट देऊन पाहणी करून आढावा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला असून दि. 15 ऑक्टोंबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहेत,विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी भेट दिल्यात.तसेच आज दुसऱ्या दिवशी 12 व्यक्तींनी 31 अर्ज घेतले असून दोन दिवसात 27 व्यक्तींनी 52 अर्ज घेतले असून एकही नामांकन अर्ज दाखल झाले नाही,अर्ज भरण्याची जत्रा मागील दिवसांत होणार असून एकच गर्दी पाहायला मिळणार आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जळगांव जामोद पवन पाटील, तहसीलदार संग्रामपूर प्रशांत पाटील, बांधकाम विभागाचे , जितेंद्र काळे,प्रवीण फुंडकर, हर्षद कुळसंगे,नायब तहसीलदार विकास शिंदे आदि शासकीय निवडणूक अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

