आमदार डॉ. संजय कुटे भरणार आज उमेदवारी अर्ज ..! केंद्रीय मंत्री ना.भूपेंद्रसिंह यादव,ना.प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून भव्य जनआशीर्वाद रॅली व जाहीर सभा ..!
दयालसिंग चव्हाण
जळगांव जामोद- आमदार डॉ. संजय कुटे हे जळगाव जा. विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज आज २८ ऑक्टोबर रोजी भरणार आहेत. सकाळी १० वाजता शहरातून भव्य जनआशीर्वाद रॅली निघणार आहे. भाजपकडून पहिल्याच यादीत जळगाव जा. मतदारसंघातून आ. डॉ. संजय कुटे यांना पाचव्यांदा संधी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते व मतदारांनी त्यांचे काम बोलता है घोषणेने जल्लोषात स्वागत केले. विकासाचा मुद्दा घेउन कूटे पुनः निवडणुकीला सामोरे जात आहेत. जळगाव जामोद मतदार संघात विकासात्मक दृष्टीने झालेला कायापालट ही कुटे यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
महायुती कडून आ. डॉ. संजय कुटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंहजी यादव,ना.प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून जळगाव जामोद मतदार संघातून हजारो कार्यकर्ते व मतदार यावेळी कुटेंच्या समर्थनार्थ उपस्थित राहणार आहेत.
चला उमेदवारी अर्ज दाखल करूया !
जळगाव जामोद मतदारसंघाला राज्यातील पायाभूत सुविधांसह विकसित मतदारसंघ करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सोमवार दि.२८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता माझा उमेदवारी अर्ज सादर करतोय, या ऐतिहासिक सभेला मला आशीर्वाद देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित
राहावे हि नम्र विनंती.
स्थळ- राठी जिनिंग वरवट बकाल रोड, जळगाव जामोद
आपलाच – डॉ.संजय श्रीराम कुटे

