नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी.. जळगाव जामोद मध्ये संजय कुटे यांच्या फार्म भरण्यासाठी लाडक्या बहीणींची रेकार्ड ब्रेक गर्दी…लाडक्या बहिणींचा संजू भाऊ घोषणा…चौका-चौकामध्ये पुष्पवृष्टी ढोल ताशाच्या गजरामध्ये महारॅली…! केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत आमदार संजय कुटेंनी भरला उमेदवारी अर्ज…!

0
92

नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी.. जळगाव जामोद मध्ये संजय कुटे यांच्या फार्म भरण्यासाठी लाडक्या बहीणींची रेकार्ड ब्रेक गर्दी…लाडक्या बहिणींचा संजू भाऊ घोषणा…चौका-चौकामध्ये पुष्पवृष्टी ढोल ताशाच्या गजरामध्ये महारॅली…! केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत आमदार संजय कुटेंनी भरला उमेदवारी अर्ज…!

 

मराठी माझा न्यूज /दयालसिंग चव्हाण
जळगांव जामोद : महायुतीतील भाजपाचे जळगाव जामोद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी कामगार मंत्री तथा आ. डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी २८ ऑक्टोबरला केंद्रीयमंत्री भुपेंद्रसिह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सर्वप्रथम राठी जिनिंग वरवट बकाल रोड जळगाव जामोद येथे भव्य दिव्य अशा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राठी जिनिंग येथुन रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली मनीषा मेडिकल, मानाजी चौक, चौभारा चौक, दुर्गा चौक असे मार्गक्रमण करीत एसडीओ कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी.. लाडक्या बहिणींचा संजू भाऊ च्या घोषणा आणि जिकडे तिकड फडफडणारे महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे यामुळे एक वेगळाच उत्साह संजुभाऊ समर्थकांमध्ये होता. जळगाव जामोद मध्ये डाँ संजय कुटे यांच्या फार्म भरण्यासाठी लाडक्या बहीणींची रेकार्ड ब्रेक गर्दी दिसून आली.

महायुतीतील भाजपाचे जळगाव जामोद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी कामगार मंत्री तथा आ. डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी आज २८ ऑक्टोबर २०२४ रोजी नामांकन अर्ज दाखल केला. सर्वप्रथम राठी जिनिंग वरवट बकाल रोड जळगाव जामोद येथे भव्य दिव्य अशा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर पर्यावरण वन जलवायू परिवर्तन मंत्री भारत सरकार तथा महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी भूपेंद्रसिंह यादव उपस्थित होते. यावेळी केंद्रीय आयुष्य । (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव व डॉ. संजय कुटे यांनी जाहीर सभेला संबोधित केले. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह नारीशक्तीने पुढाकार घेऊन प्रचार कार्याला जोमाने सुरूवात करावी असे आवाहन आ. कुटे यांनी केले. यानंतर राठी जिनिंग येथुन रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली मनीषा मेडिकल, मानाजी चौक, चौभारा चौक, दुर्गा चौक असे मार्गक्रमण करीत एसडीओ कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान मुख्य चौकांमध्ये महिलाभगिनींनी आ. संजय कुटे यांचे औक्षण केले. तसेच चौका-चौकामध्ये पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरामध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या हर्षोल्हासात नाचत गाजत मिरवणूक निघाली. आ. संजय कुटे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते देत होते. रॅलीच्या समारोपानंतर आ. कुटे यांनी एसडीओ कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.