जळगांव जामोद मतदार संघात आतापर्यंत 10 उमेदवारांनी भरले नामांकन अर्ज… ! 67 व्यक्तीकडून 110 अर्जाची उचल…उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस,आज शेवटच्या दिवशी होतंय मोठ्या प्रमाणात गर्दी…!
जळगांव जामोद/ विधानसभेच्या निवडणूक 2024 करीता 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झालेली असून 28 तारखेपर्यंत 10 उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले असून 67 व्यक्तीकडून 110 अर्जाची उचल करण्यात आली आहे. आज 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वेळ असून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. आज राजकीय पक्षाचे अधिकृत व अपक्ष उमेदवार ,पदाधिकारी ,कार्यकर्ते जळगाव (जामोद) येथे दाखल झालेले असून सभा घेवून भव्य प्रचार रॕली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आज शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी कडून काँग्रेस च्या डाॕ.स्वाती वाकेकर,वंचितकडून डाॕ.प्रविण पाटील,मनसेकडून अमित देशमुख ,तसेच इतर इच्छुक अपक्ष आपली शक्ती पणाला लावून सभाघेवून पायी प्रचार रॕली काढणार आहेत.ह्यासाठी जळगाव (जा.) मध्ये जिकडे तिकडे तुफान गर्दी दिसून येत आहे.

