जळगाव (जामोद) येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राॅंग रुमला निवडणूक निरीक्षक ( पोलीस) गुरमित सिंग चौहाण यांची भेट ; मतमोजणी केंद्राची पाहणी करुन सुरक्षेसंबंधी घेतला आढावा..!

0
56

जळगाव (जामोद) येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राॅंग रुमला निवडणूक निरीक्षक ( पोलीस) गुरमित सिंग चौहाण यांची भेट ; मतमोजणी केंद्राची पाहणी करुन सुरक्षेसंबंधी घेतला आढावा..!

बुलडाणा /- आज निवडणूक निरीक्षक ( पोलीस) श्री गुरमित सिंग चौहाण यांनी जळगाव (जामोद) , मलकापूर, खामगाव, येथील मतमोजणी केंद्र व स्ट्राॅंग रुमला भेट दिली. तसेच वरवंड, बुलढाणा, सुटाळा, खामगाव येथील स्थिर सर्व्हेक्षण पथकाची पाहणी केली.

पथक प्रमुख व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या तसेच मतमोजणी केंद्र पाहणी करुन सुरक्षेसंबंधी आढावा घेतला.

सदर ठिकाणी अप्पर पोलीस अधिक्षक खामगाव अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी मसुद खान, जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, मलकापूर,खामगाव तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक आर एन पवार, गणेश गिरी, श्रिकांत निचळ व निवडणूक निरीक्षक पोलीस यांचे संपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके हजर होते.