वंचितचे नेते चेतन घिवे यांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ह्यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश …!
संग्रामपूर (बुलढाणा) दयालसिंग चव्हाण /- वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते चेतन घिवे ह्यांचा आज 2 नोव्हेंबर रोजी वारी हनुमान येथील एका खाजगी कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव ह्यांच्या हस्ते शिवसेनेचा दुपट्टा टाकून शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा वंचित बहुजन नेते (भारीप) चेतन घिवे (पाटील) यांचा एन विधानसभा निवडणुकीत दरम्यान केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव ह्यांच्या हस्ते शिवसेनेचा दुपट्टा टाकून एका कार्यक्रमात वारी हनुमान येथे जाहीर पक्ष प्रवेश झाल्यामुळे एकच चर्चा होत आहे .यावेळी चेतन घिवे यांच्यासह इतर काहींनी सुद्धा पक्ष प्रवेश केले.ह्याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, राहुल मारोडे,भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, तालुकाध्यक्ष लोकेश राठी, शिवसेना तालुकाप्रमुख केशव ढोकने , यासह भाजप व शिवसेनेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

