महायुतीचे उमेदवार आमदार डॉ.संजय कुटे उद्या फोडणार जळगांवातून प्रचाराचा नारळ ! तिर्थक्षेत्र स्थळी नारळ फोडून होणार शुभारंभ….!
दयालसिंग चव्हाण…
जळगाव जामोद /- जळगांव जामोद मतदार संघाचे भाजपा,महायुतीचे व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचाराचा उद्या 4 नोव्हेंबरला जळगांवातून प्रचाराचा नारळ फोडणार असून जळगाव जा ,संग्रामपूर,व शेगाव या तिनही तालुक्यातील प्रमुख तिर्थक्षेत्राचे स्थळी नारळ फोडून दर्शन घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.उद्या 4 नोव्हेंबर पासून दुपारी 12.15 वा शुभारंभ होणार आहे. जळगाव जा येथून प्रारंभ तर शेगाव येथे समारोप होईल.
याप्रसंगी सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी,सर्व महायुतीच्या आघाड्यांचे, मोर्च्यांचे, प्रदेश, जिल्हा,तालुका व शहर पदाधिकारी,सर्व सन्माननीय शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोर्चा पदाधिकारी यांनी जळगांव जामोद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. संजय श्रीराम कुटे यांच्या प्रचारार्थ पवित्र तीर्थक्षेत्रांचे ठिकाणी उपस्थित राहावे,असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
असा राहील प्रचार शुभारंभाची वेळ…!

