आमदार डॉ.संजय कुटे यांचा प्रचाराचा नारळ फुटला ! श्री अंबिका देवीचे दर्शन घेत नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ ..! जनतेचा मिळणारा उदंड पाठिंबा व एकमेव दमदार नेता.. ठिकठीकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद ..!
दयालसिंग चव्हाण
जळगांव जामोद मतदार संघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ.संजय कुटे यांनी प्रचाराला सुरवात करताना जळगाव जामोद शहरातील जागृत देवस्थान असलेल्या श्री अंबिका मातेचे दर्शन घेऊन 4 नोव्हेंबर पासून निवडणुक प्रचाराचा शुभारंभ केला.
जनता पुन्हा आम्हाला आशिर्वाद देईल आणि पुन्हा राज्यात महायुतीचेचं सरकार येणार असे व्यक्तव आमदार कुटे यांनी प्रचारादरम्यान बोलताना केले. यावेळी जनतेचा मिळणारा उदंड पाठिंबा व मतदारसंघात एकमेव दमदार नेता असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ठिकठीकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, प्रचाराचे नारळ फोडून दणक्यात त्यांचा प्रचार सुरू झाला आहे. तर आगामी विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्दयावरच लढली जाणार असेही याप्रसंगी बोलतांना स्पष्ट केले. महिलांना अधिकार असणारं खरं रस्तेच सरकार असून सर्व समाज घटकाची प्रगती व्हावी,तरूणांना नोकरी,रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मतदार मोठे उद्योग,कारखाने,सिंचनाची सोय मतदार संघात करणार असल्याची ग्वाही आ डॉ.संजय कुटे यांनी दिली.निवडणूक प्रचारात पहिलं नारळ जळगाव जामोद शहरातील माळीखेल भागातील श्री अंबिका देवी मंदिरात आ डॉ.संजय कुटे,डाॅ अपर्णाताई कुटे या सपत्नीक दर्शन घेऊन फोडले. महायुतीचे शहर व परिसरातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्तेतसेच नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.महिलांची उपस्थिती लाक्षणिय होती.जळगाव जामोद मतदार संघ महाराष्ट्रात सुंदर व विकासात नंबर वन बनविण्यासाठी आ डॉ.संजय कुटे यांना निवडून आणण्याचा निर्धार जळगावकर जनतेनी यावेळी केला.व आ डाॅ संजय कुटे यांचा विजय असो,अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

