जळगाव जामोद मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अमित देशमुखसह 6 उमेदवारांची माघार ! 9 उमेदवार रिंगणात कायम..! 3 उमेदवार डॉक्टर, कोण बाजी मारणार ..?
दयालसिंग चव्हाण..
जळगाव जामोद मतदारसंघात 19 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 4 अर्ज छाननीमध्ये अवैध ठरण्यात आले होते ,त्यामुळे 15 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले. दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे अमित देशमुख यांच्यासह अपक्ष उमेदवार डॉ. संदीप वाकेकर,मंगेश मानकर, अरुण निंबोळकर,पवन गवई, देवानंद आमझरे या 6 जणांनी आपले अर्ज माघार घेतले असून आता 9 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत .त्यापैकी तीन उमेदवार डॉक्टर असून कोण बाजी मारणार, कोणाकडून मतदारसंघाचा उपचार होईल,येणाऱ्या दिवसात स्पष्ट होणार आहे यामध्ये मुख्य लढत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.स्वाती संदीप वाकेकर ,महायुतीचे डॉ.संजय श्रीराम कुटे यामध्ये लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे डॉ.प्रवीण पाटील आणि महाराष्ट्र स्वराज्य पार्टीचे उमेदवार प्रशांत डिककर त्यामुळे या ही लढत चुरशीची होणार असल्याचीही बोलले जात आहे.
जळगाव जामोद मतदारसंघातील 9 उमेदवार रिंगणात … यापैकी तिन्ही उमेदवार डॉक्टर…!
डॉ. स्वाती संदीप वाकेकर( काँग्रेस )
डॉ.संजय श्रीराम कुटे ( भाजपा)
डॉ.प्रवीण भाऊराव पाटील (वंचित)
प्रशांत काशीराम डिककर ( महाराष्ट्र स्वराज्य पार्टी )
गजानन शेंगोकार (बसपा)
अपक्ष – प्रकाश भिसे ,अजहर खान ,अफसर खान, सुजित बांगर असे 9 उमेदवार रिंगणात आहेत.

