आमदार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचार दौऱ्यात पुष्प-फुलांचा वर्षाव, नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि विकासाच्या घोषणा ; संग्रामपूर तालुक्यात ठीकठिकाणी आ.कुटे यांचं स्वागत ! पाचव्यांदा पुन्हा संजू भाऊचं येणार…?

0
100

आमदार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचार दौऱ्यात पुष्प-फुलांचा वर्षाव, नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि विकासाच्या घोषणा ; संग्रामपूर तालुक्यात ठीकठिकाणी आ.कुटे यांचं स्वागत ! पाचव्यांदा पुन्हा संजू भाऊचं येणार…?

संग्रामपूर /- (दयालसिंग चव्हाण ) जळगांव जामोद मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ.संजय कुटे यांना पाचव्यांदा उमेदवारी मिळाली असून संग्रामपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात सर्वत्र प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी गावातील पुष्प-फुलांचा वर्षाव, नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि विकासाच्या घोषणा अशा जोशपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पुन्हा पाचव्यांदा संजू भाऊचं निवडून येणार असल्याची या प्रचारात चर्चा झाली आहे.निरोड येथील छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन ग्रामफेरी संपन्न झाली. यावेळी गावातील माय-बाप जनतेची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमदार कुटे यांनी घेतले.

संग्रामपूर तालुक्यातील इटखेड, पेसोडा, हिंगणा,कुंभारखेड,काकोडा, भिलखेड,बोडखा, तामगाव,निरोड,निवाणा, चंगेफल बु,चंगेफल खु,रुधाणा ,वकाणा,आदी गावांत वासीयांच्या उत्साही भेटीनंतर जनसंवाद दौरा येथे पोहोचला. तामगावकरांनी व विशेषता विद्यार्थिनींनी फुलांच्या वर्षावात आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. गावफेरी दरम्यान नागरिकांनी घेतलेला सहभाग प्रत्येकाचा उत्साह वाढवणारा होता. काकोडा येथून निघालेला जनसंवाद दौरा बोडखा येथे पोहोचला बोडखावासी नागरिक बंधू-भगिनी नेहमीच विकासाच्या वारीत आपले योगदान देण्यासाठी आघाडीवर असतात. आज जनसंवाद दौऱ्याच्या वेळी ते पुन्हा एकदा पाहायला मिळाले. गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करून गावातील भगिनींनी औक्षण केले. मतदारसंघाच्या विकासासह सर्वसामन्यांचे हित जोपासत त्यांचा स्वाभिमान आणि सन्मान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. हाच स्वाभिमान आणि सन्मान अधिक उंचावून जळगाव जामोद पॅटर्न निर्माण करण्यासाठी आगामी काळात जनतेने आपले प्रेम आणि आशीर्वाद मला द्यावा, अशी भावना यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांनी व्यक्त केली.

आपल्या सर्वांच्या अशाच आशीर्वाद आणि प्रेमामुळे जळगाव जामोद मतदारसंघाबरोबरच आपला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी मला काम करता आले.असेही मत कुटे यांनी यावेळी केले.पुढे बोलताना म्हणाले,इतिहासाने नोंद घ्यावी अशी अनेक विक्रमी कामे आपल्या कार्यकाळात करता आली हे केवळ तुमच्या आशीर्वादामुळेच. त्यामुळे आगामी काळात देखील अशीच कामगिरी करण्यासाठी आपण सर्वांनी येत्या २० तारखेला मोठ्या संख्येने मतदानप्रक्रियेत सहभागी होऊन कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला विजयी करावे, असे आवाहन सर्वांना केले.