महायुती भाजपाचे उमेदवार माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री ना. अमितभाई शहा यांची तोफ आज १० नोव्हेंबर रोजी मलकापूर मतदार संघात धडाडणार…!
दयालसिंग चव्हाण…
बुलढाणा /- मलकापुर विधानसभा मतदार संघाचे महायुती भाजपाचे उमेदवार माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री ना. अमितभाई शहा यांची तोफ १० नोव्हेंबर रोजी मलकापूर मतदार संघात धडाडणार आहे. त्यांची भव्य जाहीर सभा स्थानिक जनता कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
भाजपाचे जेष्ठ नेते, प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार, महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांना भाजपाने सातव्यांदा उमेदवारी बहाल केली आहे. मलकापूर मतदार संघामध्ये त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला असून ग्रामीण भागासह शहरी भागातील घरोघरी पोहचून ते मतदारांना आवाहन करीत आहेत. तर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सुध्दा मलकापूर मतदार संघात फिरून महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांना निवडून देण्याकरीता पायाला भिंगऱ्या बांधल्या आहेत. तर आता देशाचे गृहमंत्री ना. अमितभाई शहा यांची तोफ रविवारी मलकापुरात धडाडणार आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे व केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ना. अमितभाई शहा हे दुपारी १ वाजता जनता कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणावर मलकापूर मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांना संबोधीत करणार आहेत. तरी या भव्यदिव्य अशा जाहीर सभेला मलकापूर मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

