आमदार डॉ संजय कुटे यांना फेटा बांधून घोडयावर बसवत ग्रामस्थांनी काढली गावातून मिरवणूक ; लाडणापूर गावांत मोठ्या उत्साहात ग्रामस्थांकडून फुलांची उधळत करत घरा-घरातील लाडक्या बहिणींनी केले औक्षण ; आमदार संजय कुटे म्हणाले, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती…!

0
126

आमदार डॉ संजय कुटे यांना फेटा बांधून घोडयावर बसवत ग्रामस्थांनी काढली गावातून मिरवणूक ; लाडणापूर गावांत मोठ्या उत्साहात ग्रामस्थांकडून फुलांची उधळत करत घरा-घरातील लाडक्या बहिणींनी केले औक्षण ; आमदार संजय कुटे म्हणाले, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती…!

संग्रामपूर ( दयालसिंग चव्हाण ) :– जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ.संजय कुटे यांची जनसंवाद दौरा संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथून सुरुवात झाली. लाडणापूर गाव दौऱ्याच्या निमित्ताने गावात आगमन होताच तेव्हा ग्रामस्थाकडून ढोल ताशांच्या गजरात प्रचंड घोषणाबाजी करीत मोठ्या उत्साहात फुलांची उधळत करत स्वागत केले.महायुतीचे उमेदवार आमदार डॉ . संजय कुटे यांना फेटा बांधुन सजविलेल्या घोडयावर बसवत ग्रामस्थांनी गावातुन मिरवणूक काढली …घरा घरातील लाडक्या बहिणीकडून लाडक्या संजुभांवाचा औक्षण करून सर्वांनी स्वागत केले.जनतेचे असे जगावेगळे प्रेम,स्नेह पाहुन आमदार कुटे खुपच भावनिक झाले होते. आमदार कुटे म्हणाले, ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताने भारावून गेलो. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे .

संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर गावात आमदार डॉ. संजय कुटे यांना घोड्यावर बसवून ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. जनसंवाद दौऱ्याची सुरुवात लाडणापूर येथून झाली. गावातील जंगदबा देवीचे दर्शन घेत गावातुन प्रचार रॅलीला सुरुवात झाली. आमदार डॉ संजय कुटे यांना घोडयावर बसण्याची विनंती ग्रामस्थांनी केली. त्याला प्रतिसाद देत कुटेंना फेटा बाधून घोड्यावर बसविले यांच्या सोबत महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना देखील ग्रामस्थांनी फेटा बांधले ,ग्रामस्थांनी मोठया उत्साहात फुलांची उधळण करत स्वागत केले.


विकास हा फक्त रस्ते किंवा इमारतींपर्यंत मर्यादित नसून खरा विकास म्हणजे प्रत्येक नागरिकाला आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहे. नागरिकांची जीवनमान उंचावण्यासाठी आधी त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे गरजेचे असून भाजपा-महायुतीने याच गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. आज शेतकऱ्यांना सन्मान निधीच्या माध्यमातून मदत मिळत आहे, महिला भगिनींना लाडकी बहिण योजनेतून लाभ होत आहे. तो लाभ देखील २१०० रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशा सर्व योजना राबवत असताना आपण कधीच कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. या उलट विरोधक सरकारच्या योजनांचा लाभ पूर्ण घेतात पण उलट सरकारला नावे ठेवून नागरिकांचा बुद्धिभेद करत आहेत. त्यामुळे यासर्वांना योग्य ते उत्तर देण्यासाठी आपल्या सर्वसामन्यांचे सरकार असलेल्या महायुतीला येत्या २० तारखेला कमळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आमदार डॉ संजय कुटे यांनी केले.