जळगांव जामोदच्या सभेतून राजे म्हणाले ; लोकांनीच हाती घेतलेल्या या निवडणुकीत प्रशांत डिक्कर यांचा विजय निश्चित ! हजारोंच्या संख्येने जनसमुदायाच्या उपस्थितीत प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी राजेंची सभा ..!
जळगाव(जा.) – महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये केवळ घोषणांचा पाऊस पडलेला आहे.तर परिवर्तन महाशक्तीच्या जाहीर सभेत उमेदवार प्रशांत डिक्कर यांचे प्रचारासाठी लाखाचे वर देणगीदरांनी देणगी देवून पैश्यांचा पाऊस पडल्याचे चित्र जळगाव (जा.)येथील भव्य जाहीर सभेत दिसून आला तसेच एकाने सोन्याची अंगठी व शेतजमीन विकून देणगी दिली त्यामुळे स्वराज्यचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजी राजे भारावून गेले.जळगांव जामोद येथे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी राजेंची सभेला हजारोंच्या संख्येने जनसमुदायात सभा पार पडली.या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे स्वरूप प्राप्त झालेली ही निवडणूक लोकांनीच हाती घेतलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांचा विजय निश्चित आहे.
महायुतीला आता कापूस, सोयाबीनचे हमीभाव दिसतात. निवडून आल्यावर कर्जमाफी देऊ म्हणतात. आतापर्यंत वर केंद्रात व खाली राज्यात सरकार त्यांचेच होते. कर्जमाफी पण सोडाच परंतु आतापर्यंत अतिवृष्टीचे व पिक विम्याचे पैसे मिळाले नाहीत.ह्या विधान सभा सःघातील तीन तालुक्यापैकी एकाही तालुक्यात एक साधा प्रक्रिया उद्योग सुद्धा २० वर्षे आमदार राहिलेल्या व्यक्तीने ह्या मतदारसंघात आणला नाही. आता कोणत्याही भूल थापांना बळी न पडता परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करा व परिवर्तन घडवा असे आवाहन परिवर्तन महाशक्ती चे संयोजक तथा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अध्यक्ष राजे छत्रपती संभाजी यांनी केले.
दि. 10 नोव्हेंबर रोजी जळगाव (जा.) स्थानिक बायपास वरील मैदानावर उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत हजारोंच्या मतदारासमोर बोलत होते.
अनेक वर्षांपासून शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी चळवळीच्या माध्यमातून कार्य करत असलेल्या प्रशांत डिक्कर यांना विधानसभेमध्ये पाठवणे हा इथल्या सामान्य जनतेचा विजय असेल.आजही त्यांच्या आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात. पत्नी शिलाई काम करुन संसाराचा गाडा हाकतात. इतक्या हालाखीच्या परिस्थितीत सुध्दा लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या प्रशांत डिक्कर यांनी लोकसेवेचा वसा सोडलेला नाही. जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम पाहून क्षणभर मीही भावूक झालो. सभेमधील कित्येक उपस्थितांनी व विशेषत: माय-भगिनींनी त्यांच्या निवडणुकीसाठी आपापल्या परीने व अत्यंत आत्मीयतेने देणग्या दिल्या. कित्येक तरुणांनी त्यांच्या प्रचारासाठी पूर्ण वेळ दिलेला आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी जनता हीच त्यांची खरी श्रीमंती आहे.अशीही प्रतिक्रिया छत्रपती संभाजी राजे यांनी बोलतांना दिली आहे.

