जळगांव जामोदच्या अपक्ष उमेदवाराचा चक्क ५०० रुपयाच्या बाँड पेपर वर जाहिरनामा ; सौ बका एक लिखा…!
संग्रामपूर /- जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टीचे पुरस्कृत उमेदवार सुजित श्रीकृष्ण बांगर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवणूक लढवीत आहेत. बांगर यांनी आता प्रचारात आघाडी घेतली आहे मतदारांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.त्यांनी आपला जाहीरनामा चक्क ५००( पाचशे ) रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरतीच लिहून दिला आहे.
अपक्ष उमेदवार सुजित बांगर यांनी एस सी, एस टी, ओबीसी, आणि मायनॉरिटी यांचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी व शेतकरी शेतमजूर,विद्यार्थी,युवा आणि महिलांसाठी रस्त्यावरचा लढा देणारे मतदारसंघांमध्ये एक सामाजिक चेहरा ज्यांचा प्रस्थापित झालेला आहे असे सुजित श्रीकृष्ण बांगर हे बहुजन मुक्ती पार्टीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. प्रस्थापितांसारखे पोकळ आश्वासने न देता त्यांनी आपला जाहीरनामा चक्क ५००( पाचशे ) रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरतीच लिहून दिला आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजकारणाला एक वेगळी दिशा येतांना दिसत आहे. या जाहीरनाम्यामुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे बोलले जात आहे. सर्वत्र सुजित बांगर यांच्या जाहीरनाम्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बांगर हे सामान्य कुटुंबातील असल्यामुळे मतदारसंघातील तरुणांनी बांगर यांचा जाहीरनामा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वखर्चाने फिरण्याची/ प्रचार प्रसार करण्याची तयारी करताना दिसत आहेत.

