शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांना गावभेट दौऱ्यात मिळतोय उदंड प्रतिसाद ; विरोधी उमेदवार हे कोट्याधीश,त्यांच्या तुलनेत मी भूमिहीन शेतमजुराचा पुत्र…संघर्ष जारीच ठेवून, अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहणार – प्रशांत डिक्कर !
जळगाव(जामोद): महाराष्ट्र जनस्वराज पक्ष, शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष यांचे संयुक्त परिवर्तन महाशक्तीचे विधानसभेचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे ढोल ताशाचा गजरात त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच घरोघरी महिलांनी त्यांचे औक्षण करून आपला लाडका भाऊ म्हणून त्यांना निवडणूक खर्चासाठी महिलांनी पैसे सुद्धा दिलेयं, प्रशांत डिक्कर यांची विजयाकडे वाटचाल निश्चित असल्याने विजय उमेदवाराच्या जल्लोषाप्रमाणे गावकऱ्यांनी त्यांचे उत्सुक स्वागत केले आणि संपूर्ण गावात घोड्यावरून स्वागत मिरवणूक काढली. शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सतत सक्रिय असणाऱ्या आणि घरा दारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र संघर्ष करणार्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिले.
आपल्या विरुद्ध चे इतर उमेदवार हे कोट्याधीश आहेत.त्यांच्या तुलनेत आपण भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण शेतमजूर दलित वंचित मागासवर्गीयांसाठी सतत संघर्ष करीत असतो. निवडून आल्यावर आपण आपला संघर्ष जारीच ठेवून आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहु असेही यावेळी सांगितले.
त्यांच्या ह्या प्रचार दौऱ्यादरम्यान
उज्वल पाटील चोपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे, सद्दाम भाई, कैलास ठाकरे, योगेश मुरुख, कलिमोद्दीन काझी यांच्या सह घोड्यावर मिरवणूक निघाली यांची उपस्थिती होती.

