आज आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोनाळा व पातुर्डा येथे भव्य जाहीर सभा..!

0
49

आज आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोनाळा व पातुर्डा येथे भव्य जाहीर सभा..!

संग्रामपूर /- जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातुन भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आठवले गट, पिरिपा, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार व माजी कामगार मंत्री भाजपाचे स्टार प्रचारक आ. डॉ. संजय कुटे यांची आज 13 नोव्हेंबर रोजी सोनाळा व पातुर्डा ता.संग्रामपूर येथे जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांनी केले आहे.

मागील 20 वर्षाच्या कार्यकाळात आ. डॉ. संजयभाऊ कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघाचा कायापालट केला. आता पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असून निवडणूक प्रचारार्थ आ. डॉ. संजय कुटे यांची जाहीर सभा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तसेच पातुर्डा येथे रात्री 7.30 वाजता भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे. या जाहीर सभेला महायुतीचे नेते, मतदार संघातील पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. तरी दोन्ही ठिकाणच्या जाहीर सभेला मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.