काम बोलता है..! मतदारसंघात एकच चर्चा…संजूभाऊ आमच्यासाठी देवमाणूस, त्यांना निवडून आणून विकास वेगवान करू….पातुर्डा येथील जाहीर सभेत संजूभाऊच्या हाकेला मतदारांची साद…!

0
68

काम बोलता है..! मतदारसंघात एकच चर्चा…संजूभाऊ आमच्यासाठी देवमाणूस, त्यांना निवडून आणून विकास वेगवान करू….पातुर्डा येथील जाहीर सभेत संजूभाऊच्या हाकेला मतदारांची साद…!

संग्रामपूर /- जळगाव जामोद मतदारसंघ विकासापासून कोसो दूर होता,मागील वीस वर्षात भकास असलेल्या मतदारसंघाला सुंदर बनवले मतदारसंघात रस्ते पाणी वीज सिंचन दवाखाने, शासकीय इमारती,शाळा असे विविध विकास कामे करून विकासाचे एक मॉडेल जळगाव जा मतदारसंघाला ओळख मिळवून दिली. त्यामुळेच उत्साही कार्यकर्त्यांनी क्या बोलता है, काम बोलता है! असा नारा प्रसिद्ध केला.काम बोलता है! हा प्रचाराचा मुख्य नारा बनला आहे.ज्या ठिकाणी सभा प्रचार रॅली पदयात्रा असेल त्या ठिकाणी कार्यकर्ते व नागरिक क्या बोलता है… काम बोलता है …अशा घोषणा देतांना दिसून येतात. व संजूभाऊ आमच्यासाठी देवमाणूस असून त्यांना निवडून आणून विकास वेगवान करू असे मतदार बोलत आहेत.

चोंढी प्रकल्प पूर्ण झाला,आता अरकचेरी,हे प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत,जिगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेचे काम वेगाने सुरू असून येत्या दोन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतावर पाणी पोहचवणार आहे,यामुळे 44 हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येवून शेतकऱ्यांसह मतदारसंघ समृध्द होणार असल्याचे महायुतीचे उमेदवार डाॅ संजय कुटे यांनी सांगितले.
भाजपा शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,
रिपाई आठवले गट,पिरिपा,
रयत क्रांती संघटना,लहुजी शक्ती सेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय श्रीराम कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे भव्य जाहीर सभा आयोजित केली होती. जात-पातीच्या राजकारणाला थारा न देता मतदारांनी विकास कामांना पसंती देत संजूभाऊ कुटे यांच्या हाकेला सभेतून साद दिली.
मतदार संघातील प्रत्येक जण माझा व मी प्रत्येकाचा आहे,असा विचार रुजवला.
सारा महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने मोठ्या ताकतीने वाटचाल करत आहे. त्याच धर्तीवर जळगाव जामोद मतदारसंघ सुद्धा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगून विरोधक मात्र जातीपातीचे राजकारण करत मतदारांमध्ये भ्रम पसरवत असल्याचे सांगत पातुर्डा येथील जाहीर सभेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे व जनतेचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांना मतदानरूपी आशिर्वाद देवून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे आवाहन
मध्यप्रदेश सरकारमधील माजी मंत्री तथा आमदार अर्चनादीदी चिटणीस बुरहानपुर यांनी केले.
याप्रसंगी राकाँ चे विधानसभा प्रमुख रंगराव देशमुख, उपसरपंच आशाताई वानखडे, ज्येष्ठ नेते रामेश्वर इंगळे ,कृष्णराव रहाटे ,श्रीकांत मोरखडे, संग्रामपूर भाजप तालुकाध्यक्ष लोकेश राठी, श्रीकृष्ण बोदडे ,माजी सभापती गजानन दाणे, संतोष डोसे, रत्नप्रभा धर्माळ ,राष्ट्रवादीचे विश्वासराव मोरखडे, नरेश घिवे, शिवसेनेचे चेतन घिवे, शोभाताई रहाटे ,अरुणा आढाव ,सुमन तायडे ,छायाताई बोपले ,अनुसया बावस्कार, राजीव सातव, वैभव धर्माळ, प्राजक्ता गवई मशउल्ला भाई, नानाभाऊ निमकर्डे श्रीकृष्ण मोहनकर मुरलीधर धानोरकर विठ्ठल पुंडे रामराव पवार आदीसह महायुती महायुतीचे नेते व पदाधिकारी प्रामुख्याने व्यासपिठावर उपस्थित होते.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर तायडे यांनी केले.संचलन रमण सेवक यांनी केले.आभार भगवानदास राठी यांनी मानले.ह्यावेळी या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक,महिला, उपस्थित होते.