छत्रपती संभाजी राजे आणि दिपकभाई केदार यांच्या उपस्थितीत परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ आज भव्य मोटरसायकल रॅली…!
संग्रामपूर : परिवर्तन महाशक्तीचे जळगाव जामोद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डीक्कर यांच्या प्रचारार्थ आज 15 नोव्हेंबर रोजी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे आणि दीपकभाई केदार यांची उपस्थिती राहणार आहे.
शेतकऱ्यांसाठी लढा देणारे प्रशांत डिक्कर जळगाव जामोद मतदार संघात परिवर्तन आघाडीकडून निवडणूक लढवित आहत. त्यांच्या प्रचाराचा मतदार संघात झंझावात सुरू असून जनसामान्यांसह मतदार व शेतकरी बांधवांकडून त्यांना उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज शुक्रवारी त्यांच्या प्रचारार्थ भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जामोद बायपास वरील मुंबई दरबार हॉटेल समोरील मैदानापासून सकाळी ९ वाजता रॅलीला सुरूवात होवून संग्रामपूर, वरवट बकाल, मनसगाव मागें रॅली शेगाव येथे पोहोचेल. शेगाव येथे गजानन दादा पाटील मार्केट यार्ड येथे या रॅलीचे दुपारी 12.30 वाजता जाहीर सभेमध्ये रूपांतर होणार आहे. ह्यावेळी छत्रपती संभाजी राजे आणि भाई दीपक केदार यांचेसह परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे मार्गदर्शन करणार आहेत.या मोटार सायकल रॅलीमध्ये व सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिवर्तन महाशक्तीचे उज्वल पाटील चोपडे आणि रोशन देशमुख यांनी केले आहे.

