“कोण आया रे कोण आया,आदिवासी का शेर आया” “क्या बोलता है,काम बोलता है!”लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ,संजूभाऊ, संजूभाऊ” च्या घोषणा; महाविजयाचा निर्धार करु या;डाॅ.संजय कुटे यांनाच निवडून आणू या…! आदिवासी बांधवांच्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद! संजूभाऊच्या विजयासाठी आदिवासी बांधवांचाही प्रचारात सहभाग …!

0
69

“कोण आया रे कोण आया,आदिवासी का शेर आया”
“क्या बोलता है,काम बोलता है!”लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ,संजूभाऊ, संजूभाऊ” च्या घोषणा; महाविजयाचा निर्धार करु या;डाॅ.संजय कुटे यांनाच निवडून आणू या…! आदिवासी बांधवांच्या मोटरसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद! संजूभाऊच्या विजयासाठी आदिवासी बांधवांचाही प्रचारात सहभाग …!

जळगांव जा : महाविजयाचा निर्धार करूया आमदार डॉक्टर संजय कुटे यांना निवडून आणू या…. असा निर्धार करत आदिवासी बांधवांनी 15 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यात मोटरसायकल रॅली काढली. या मोटरसायकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.रॅलीत शेकडो आदिवासी बांधवांचा सहभाग राहिला.युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
पारंपारिक वेशभूषेतील तसेच अंगात आ डॉ.संजय कुटे यांचा फोटो असलेले टी शर्ट रॅलीतील आकर्षण होते.

आदिवासी बांधव जळगांव जा शहरातील-राठी जिनिंग येथे एकत्रित येवून भाजपा महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांचेहस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ झाला.
रॅलीत युवकांचा उत्साह पाहावयासारखा होता.आदिवासी युवकांचा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे डाॅ संजय कुटे यांचेवरील प्रेम यामाध्यमातून व्यक्त होत होते.
जळगाव जा मतदार संघातील
भाजपा शिवसेना राकाॅ रिपाई आठवले गट,पिरिपा,लहुजी शक्ती सेना,रयत क्रांती संघटना व मित्रपक्ष
महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांचे राठी जिनिंग परिसरात आगमन होताच “कोण आया रे कोण आया,आदिवासी का शेर आया”
“क्या बोलता है,काम बोलता है!”लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ,संजूभाऊ, संजूभाऊ” च्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.
मोटरसायकल रॅली जळगाव जा मधील राठी जिनिंग मधून सुरू होवून-जूना भाजीबाजार-मानाजी चौक- चौभारा-दूर्गा चौक-निमखेडी फाटा-वडगांव गड-पळशी- मोहिदेपूर-पळशी घाट फाटा-पिंपळगांव काळे-खांडवी
-भेंडवड- पातूर्डा फाटा-वरवट फाटा-सोनाळा-टुनकी-जामोद या परिसरात पोहोचली.ठिकठिकाणी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
मोटरसायकल रॅलीतील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सर्वच स्तरातून डॉ.संजय कुटे यांना पाठींबा मिळत असून त्यामुळे डॉ.संजय कुटे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

● भाजपा महायुतीचे उमेदवार आ डॉ.संजय कुटे यांच्या क्रमांक 1कमळ चिन्हासमोरील बटन दाबून ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून मतदार राजा ला करण्यात आले.
या नंतर खेर्डा, जामोद व पिंपलगांव काले येथे प्रचंड मोठ्या जनसमुदाय समोर जाहिर सभा झाल्या. यावेली आता पर्यंत केलेल्या विकास कामांचा पाढाच वक्त्या कडून व्यक्त केला गेला. तर आमदार संजय कुटे यांनी उपस्थित जनसमुदाया समोर पुढ़िल पाच वर्ष कसे महत्वाचे आहेत आणि पुढ़िल पाच वर्षात आपन कशा प्रकारे मतदारसंघात औद्योगीक क्रांति आनुन आपण सर्व सामान्य जनतेच्या आर्थिक उन्नती साठी प्रयत्न करनार असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले.

https://www.facebook.com/share/r/189zEHpJLR/