छत्रपती संभाजी राजे, बच्चू कडू, दिपक केदार यांची तोफ आज धडाडणार, परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ वरवट बकाल येथे धडाकेबाज सभा…!
संग्रामपूर /- विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यास अवघे दोन दिवस राहिले असून, प्रचार यंत्रणेने वेग घेतला आहे. सभांचा धडाका सुरू असून, ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू , स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी राजे,ऑल इंडिया पँथर सेनेचे दिपक केदार यांच्या ताेफा जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिककर यांच्या प्रचारार्थ जळगांव जामोद मतदारसंघ संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे धडाडणार आहेत. आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता वरवट बकाल येथील इंडियन पेट्रोल पंप च्या बाजूला सोनाळा रोड, जाहीर सभेला संबोधित करणार आहे.
जळगांव जामोद मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार शेतकरी नेते प्रशांत काशीराम डिककर यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी राजे, आमदार बच्चू कडू,दिपक केदार यांची सभा होत आहे. या सभेमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या सभेसाठी मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिवर्तन महाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.

