कोण होणार आमदार जळगांव जामोदचा..! जिकडे तिकडे एकच चर्चा ! भाऊ की ताई…कोण जिंकणार ! गुलाल कोणाचा उधळणार! फटाके कोणाचे फुटणार !

0
70

कोण होणार आमदार जळगांव जामोदचा..! जिकडे तिकडे एकच चर्चा ! भाऊ की ताई…कोण जिंकणार ! गुलाल कोणाचा उधळणार! फटाके कोणाचे फुटणार !

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात काल 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. सर्व मतदारांनी आपली शक्ती पणाला लावून प्रचार करून मतदारांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाकडे मतदार झुकले भाऊ की ताई ! गुलाल कोणाचा उधळणार! फटाके कोणाचे फुटणार, जिकडे तिकडे एकच चर्चा !
कोण होणार आमदार जळगांव जामोदचा..! याबाबत आजही मतदार संभ्रमात असून विजय कोणाचा होणार ? 23 तारखेला मतदारसंघाचा मतदानाचा निकाल लागणार असून या निकालात कोण विजयी व कोण पराभूत होणार हे ठरणार आहेत या निकालाकडे संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

जळगाव (जामोद) मतदारसंघात कधी नव्हे अशी निवडणूक व प्रचार धूमधडाक्यात झाली दोन- तीन उमेदवारांनी आपली शक्ती पणाला लावून निवडणूक लढवली. आणि मोठ्या उत्साहाने निवडणूक झाली. या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. बहुसंख्य ठिकाणी मतदार मतदानासाठी बाहेरच निघाले नाहीत, कारण की काही आर्थिक फायदा होईल का? शेवटी अखेर लढत असणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असल्याने आपल्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांना सुचना देवून काहीतरी आर्थिक उलाढाल करुन शेवटी मतदार दुपारी 4 वाजे नंतर अनेक मतदार झुंडीच्या झुंडीने मतदानासाठी बाहेर पडलेत ,अशी सर्वत्र चर्चा होत होती. संध्याकाळी 5 वाजेपासून संग्रामपूर शहरासह अनेक ठिकाणी गर्दी होवून रात्री अनेक भागात सात ते आठ वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली, परंतु प्रत्यक्ष मतदान महायुतीला की महाविकास आघाडीला झाले. हे शेवटपर्यंत ते समजू शकले नाही, काल आणि आज सर्वत्र जिकडे तिकडे एकच चर्चा होत आहे. या प्रचारात उमेदवारांनी आपले जातीय समीकरण व आपल्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुका लढवल्या पण ऐनवेळी प्रत्येक उमेदवारांनी आपल्या रणनीती बदलून निवडणुकीत विजयी होणाऱ्या मानस ठेवला आणि निवडणुकीत विजय होण्यासाठी वाटेल ते कराण्याचे नियोजन केलं यामुळे महायुतीतील डॉ.संजय कुटे , महाविकास आघाडीच्या डॉ.स्वातीताई वाकेकर यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाल्याचे दिसून येते, तसेच स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डीक्कर व वंचित बहुजन आघाडीचे डॉ.प्रवीण पाटील ह्या किती मतदान घेणार ब ह्यांचे मतदान कोणाच्या विजयाचे किंवा पराभवाचे ठरणार ! भाऊ की ताईचा गुलाल उधळणार !कोणाचे फटाके फुटणार! यामुळे सर्व मतदार संभ्रमात आहेत, शेवटी 23 नोव्हेंबर शनिवारी कोण निवडून येणार? कोणाचा गुलाल उधळणार! कोण निवडून येणार! हे समजणार शेवटी जो उमेदवार निवडून येईल व आमदार होईल,तो आमच्याच पक्षाचा आमदार म्हणून जल्लोष होईल एवढं मात्र खरं.