केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शांताराम दाणेसह संग्रामपूर तालुका शिवसैनिकांनी ना.जाधवांचा केला सत्कार !

0
92

केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शांताराम दाणेसह संग्रामपूर तालुका शिवसैनिकांनी ना.जाधवांचा केला सत्कार !

संग्रामपूर – केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवस निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे सह संग्रामपूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहकर येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी भव्य असा सत्कार केला. वाढदिवस निमित्ताने मेहकर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते म्हणून केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव हे दिवसभर तेथील कार्यक्रमातच उपस्थित राहिले. शिबिरात थांबून दिवसभर त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

जिल्हाभरातील शिवसैनिकांनी मेहकर येथे हजेरी लावली व शुभेच्छा दिल्या. यात संग्रामपूर तालुक्यातील शिवसैनिकांचा सुद्धा समावेश होता. येथील शिवसैनिकांनी ना. प्रतापराव जाधव यांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिवसैनिकांचे त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृउबासचे सभापती शांताराम दाणे,उपजिल्हाप्रमुख राहुल मारोडे, जळगाव जा. विधानसभा मतदार संघ संघटक कैलास कडाळे पाटील, तालुका प्रमुख केशव ढोकणे, संजय खोंड, कृउबासचे संचालक तथा रिंगणवाडी चे सरपंच रवींद्र रावणकर इत्यादी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.