जळगांव जामोद मतदारसंघात फक्त डॉनच ….! आमदार संजय कुटेंचा “मैं हूं डॉन”वर भन्नाट डान्स तुफान व्हायरल !
संग्रामपूर : नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विधानसभा जळगांव जा. मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी ५ व्यांदा विजयश्री प्राप्त केल्यानंतर विजयी झाल्याबरोबर मतमोजणी कार्यालयाबाहेर आमदार डॉ. संजय कुटे यांनी डिजेच्या तालावर अमिताभ बच्चन यांचे सुप्रसिध्द मैं हु डॉन गितांवर भन्नाट डान्स केला. सदरचा डान्सचा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसअॅपवर,युट्युबवर , तुफान व्हायरल झाला आहे.
जळगाव जामोद विधानसभेचे भाजपाचे आमदार डॉ.संजय कुटे हे कायमच चर्चेत असतात त्यांनी निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवून ते खरंच या मतदार संघातील डॉन असल्याचे सिद्ध केले आहे. त्यातच विजय घोषित झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीत त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे , मै हू डॉन या गाण्यावर ते नाचले आहेत,आमदार कुटे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या कार्याच्या माध्यमातून आणि विरोधकांना जे काही सांगायचं आहे ते सांगून दिल्याचे बोलत जात आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभेचे भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे यांचा हा डान्स पाहून लोकांना काही दिवसांपूर्वीची एका नेत्याचा व्हिडिओ डॉन म्हणून वायरल झाल्यानंतर त्या आव्हानाची आठवण आली आहे ,त्यावेळीही मैं हू डॉन हे गाणं चर्चेत आलं आहे, मात्र डॉ.कुटे यांचे सर्वांचे गणिते चुकीचे ठरवेत मतदारसंघात फक्त आपणच डॉन असल्याचे सिद्ध केलं . आमदार डॉ.संजय कुटे यांचा दिलखुलास अंदाज विजयी मिरवणुकीत पहायला मिळालं आहे. मिरवणूकत कार्यकर्त्यांसह डॉ. कुटेही थीरकले यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थित त्यांनी एकच जल्लोष केलाय त्यांनी केलेला मै हू डॉन गाण्यावर डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ते आनंद घेतांना दिसले आहे.आपल्या नेहमीच्या शालीत आणि शांत स्वभावाला एकदम छेद देत संजूभाऊ यांनी केलेला डान्स पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांसह चाहत्यांना त्यांना सुपर से उपर अशा प्रतिक्रिया दिले आहेत जळगाव जामोद मतदारसंघात भाजपने काँग्रेसचा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळवला. या डॉक्टर संजय श्रीराम कुटे विक्रमी मतांनी विजयी झाले. तर हा विजय मतदार संघातील मातृशक्ती आणि मायबाप जनतेचा असल्याची पहिली प्रतिक्रिया विजयानंतर आमदार डॉक्टर कुटे यांनी दिले.प्रत्येक बिटवर उत्कृष्ट अदाकारी करीत सदरचा डान्स त्यांनी केला.सदरचा डान्स सध्या फुल्ल टू व्हायरल होत असुन नेटकरी मंडळी कडुन चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

