संग्रामपूर तहसिलदार ॲक्शन मोडवर ! एकाच दिवशी अवैद्य रेती वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले ; 3 लाख 66 हजाराचा दंड ; या धडक कारवाईमूळे रेती माफियांवर वचक बसेल का ?

0
53

संग्रामपूर तहसिलदार ॲक्शन मोडवर ! एकाच दिवशी अवैद्य रेती वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले ; 3 लाख 66 हजाराचा दंड ; या धडक कारवाईमूळे रेती माफियांवर वचक बसेल का ?

दयालसिंग चव्हाण
संग्रामपूर /- तालुक्यातील नदी नाल्यांमधून सर्रासपणे रेतीची अवैध वाहतूक सुरू असतांना संग्रामपूर तहसिलदार ॲक्शन मोडवर आले असून महसूल विभागाकडून 9 डिसेंबर रोजी तहसीलदार प्रशांत पाटील,नायब तहसीलदार एच.एन.उकर्डे,विकास शिंदे,मंडळ अधिकारी, तलाठी यांनी अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्राॕलीसह पकडून 2 ट्रॅक्टर तामगाव व 1 सोनाळा पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे.प्रत्येकी वाहनावर 1 लाख 22 हजार असा एकूण 3 लाख 66 हाजराचा दंड ठोठावला आहे.

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी बु.- लाडनापूर रस्त्यावर 9 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता एम एच 40 सी एच 2985 हे ट्रॉलीसह ट्रॅक्टर अवैधरित्या विना परवाना रेती वाहतूक करतांना आढळून आल्याने तहसीलदार प्रशांत पाटील व प्र.ना. तहसीलदार एच उकर्डे यांनी सदर ट्रॅक्टर ट्रालीसह रेतीने भरलेले तामगाव पो.स्टे.जमा केले आहे. तर दुसऱ्या कारवाईत दुपारी १२.५० वा.च्या दरम्यान मौजे भोन रोडवरील पंप हाऊस जवळ एम एच 25…. हे ट्रॅक्टर ट्रॉलीसह विनापरवाना वाहतूक करतांना आढळून आले तर त्याचवेळी एम एच- २८,५४ ३६ क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहने विनापरवाना रेती वाहतूक करतांना आढळून आल्याने तलाठी गौरव पाटील, सारिका भालेराव, प्रदीप नरवाडे ,अविनाश खरे, मंडळ अधिकारी बुरजे पाटील ,ना.तह. तहसीलदार विकास शिंदे, आणि प्र.नायब तहसीलदार एच.एन.उकर्डे यांच्या पथकाने दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉली रेती सह पकडून तामगाव पो.स्टे.ला जमा केल्याची माहिती मिळाली आहे. आता संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटीलसह महसूल विभाग चांगलाच ॲक्शन मोडवर आल्याने एकाच दिवसात तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह रेतीने भरलेले अवैध रेती वाहतूक करतांना पकडले गेल्याने तिन्ही वाहनावर एकूण 3 लाख 66 हाजराचा दंड ठोठावला आहे. यामुळे अवैध रेती वाहतुक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. या कारवाईमूळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर वचक बसेल का ?असा प्रश्न नागरिकांकडून होत आहे.