व्हाईस ऑफ मिडीया संग्रामपूर तालुका कार्यकारणी घोषित ! अध्यक्षपदी नारायण सावतकार ; श्याम देशमुख कार्याध्यक्ष, मकसूद अली सचिव पदी ..! तर दयालसिंग चव्हाण यांच्या खांद्यावर डिजिटल विंगच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी !

0
82

व्हाईस ऑफ मिडीया संग्रामपूर तालुका कार्यकारणी घोषित ! अध्यक्षपदी नारायण सावतकार ; श्याम देशमुख कार्याध्यक्ष, मकसूद अली सचिव पदी ..! तर दयालसिंग चव्हाण यांच्या खांद्यावर डिजिटल विंगच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी !

संग्रामपूर /- व्हाईस ऑफ मिडीयाची संग्रामपूर तालुकास्तरीय संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शिक्षक सोसायटीचे सभागृहात 22 जानेवारी रोजी बैठक पार पडली.या बैठकीत व्हाईस ऑफ मिडियाची संग्रामपूर तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी नारायण सावतकार, कार्याध्यक्षपदी श्याम देशमुख, सचिवपदी मिर मकसुदअली यांची नावाची घोषणा केली. तर डिजीटल विंगच्या तालुका अध्यक्षपदी दयालसिंग चव्हाण ह्यांची निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी तर प्रमुख म्हणून जिल्हाअध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा सरचिटणीस सुनिल तिजारे यांच्यासह तालुक्यातील जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने, प्रल्हाद दातार, काशीनाथ मानकर, किशोर खडे, आकाश पालीवाल हे होते.
यावेळी आकाश पालिवाल यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मंचकावरील मान्यवरासह जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी पुष्पहाराने सत्कार केले.

कृष्णा सपकाळ, सुनील तिजारे,भाऊ भोजने, रामेश्वर गायकी,प्रल्हाद दातार आदी मान्यवरांनी भाषणातून व्हाईस ऑफ मीडिया बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी अजहर अली, किशोर खडे, सुचित धनभर, शेख अब्दुल,विवेक राऊत, मतीन शेख, नंदू शिरसोले, युसूफ शेख, ज्ञानेश्वर दांदळे, स्वप्नील देशमुख, संतोष आगलावे, शेख कदीर, साबीर खान,दयालसिंग चव्हाण, अशोक आकोटकार यांच्या सह संग्रामपूर तालुक्यातील 30-35 पत्रकार बांधव या वेळी उपस्थित होते.

अशी आहे तालुका कार्यकारणी …
अध्यक्ष – नारायण सावतकार,
कार्यध्यक्ष – श्याम देशमुख,
सचिव – मीर मकसूद अली
उपाध्यक्ष – सूचित धनभर
उपाध्यक्ष- सागर कापसे
उपाध्यक्ष – शेख युसूफ
उपाध्यक्ष – किशोर खडे
कोषाध्यक्ष – संतोष आगलावे
संघटक- नंदू शिरसोले
संघटक- अझहर अली
संघटक- स्वप्नील देशमुख
संघटक- शेख मतीन
अशा नावाची घोषणा करण्यात आली आहे.