प्रीपेड मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा विद्युत वितरण उपविभाग संग्रामपूर यांना देण्यात आला…

0
115

प्रीपेड मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा विद्युत वितरण उपविभाग संग्रामपूर यांना देण्यात आला…अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटने कडून विद्युत वितरणाला आंदोलनाचा इशारा…

संग्रामपूर /- राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटना संग्रामपुर तालुका अध्यक्ष विशाल बकाल यांच्याकडून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित संग्रामपूर कार्यालयाला 27 जानेवारी 2025 रोजी तालुक्यातील खाजगी प्रीपेड मीटर बदलण्याचे काम थांबवण्याबाबत निवेदन देण्यात आले

तसेच दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे खाजगी ठेकेदारांकडून मीटर बदलण्याचे काम जोरात सुरू आहे

प्रीपेड मीटर लावल्यामुळे गोरगरीब नागरिकांना अनेक अडचणीच्या समोर जावे लागत आहे प्रीपेड मीटर हा मोबाईल रिचार्ज सारखा कार्यरत असून रिचार्ज नसल्यास वीस पुरवठा थांबतो त्यामुळे गरीब सामान्य लाभार्थ्यांवर आर्थिक संकट येण्याचे दिसते प्रीपेड मीटर मुळे लाभार्थ्यांची वीज दरामध्ये वीस ते तीस टक्के पर्यंत नुकसान होण्याची शक्यता असून काही ठेकेदारांकडून जबरदस्तीने आणि विनापरवानगी मीटर बदलवण्याचे काम घडत आहे हा प्रकार अन्यायकारक असून लाभार्थ्यांना आर्थिक शोषणाला चालना मिळत आहे म्हणून राष्ट्रीय अल्पसंख्याक बिछडा वर्ग संघटना कडून तालुक्यातील सुरू असलेले प्रीपेड मीटर बसण्याचे काम त्वरित थांबण्यात यावे लाभार्थ्यांच्या परवानगीशिवाय मीटर बदलण्याचे काम करू नये गोरगरीब लाभार्थ्यांच्या हिताचे रक्षण करून त्यांच्या विरोधातील हा अन्यायकारक प्रकार थांबावा तसेच या संदर्भात त्वरित योग्य ती निर्णय घेण्यात यावा अन्यथा गोरगरिबांच्या हक्कासाठी अल्पसंख्यांक पिशव्या वर्ग संघटनाचे तालुकाध्यक्ष विशाल बकाल व त्यांच्यासह सर्व तालुकास्तरीय पदाधिकारी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असे निवेदन अल्पसंख्यांक तिच्या वर्ग संघटनाचे तालुकाध्यक्ष विशाल बकाल सचिव अजहर मोहम्मद मनोहर अमन कार प्रसाद गावंडे नामदेव कोकाटे सुधाकर पांडुरंग डाखोडे आशिष बकाल शरद जाधव अविनाश अवचार दत्ताभाऊ शेख अखिल इत्यादी लोकांनी निवेदनावर सह्या करून माहितीस्तव प्रतिलिपी तहसील कार्यालय संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशन कार्यकारी अभियंता खामगाव जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना दिलेल्या निवेदनाचीं प्रत देण्यात आली आहे