वसाळी येथे आज एकाच छताखाली होणार सर्वच कामे! तहसिलदार प्रशांत पाटील ! सोनाळा मंडळातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ! वसाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान !

0
15

वसाळी येथे आज एकाच छताखाली होणार सर्वच कामे! तहसिलदार प्रशांत पाटील ! सोनाळा मंडळातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ! वसाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान !

संग्रामपूर /- तालुक्यातील सोनाळा मंडळातील शेतकरी व नागरिकांसाठी आज ४ जुन बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबीर अभियान जिल्हा परिषद शाळा वसाळी येथे सकाळी १० वाजता आयोजीत करण्यात आले आहे. एकाच छताखाली सर्वच प्रकारचे कामे होणार असून सोनाळा मंडळातील लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संग्रामपूर तहसिलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत जातीचे दाखले,उत्पन्न दाखले,संजय गांधी ,श्रावणबाळ, पीएम किसान, फार्मर आयडी, आधार दुरुस्ती, राशन कार्ड दुरुस्ती व नवीन कार्ड तयार करने, वारस नोंदी, विविध तहसील कार्यालयातील दाखले, घरकुल मोफत 5 ब्रास वाळू, आयुष्मान कार्ड, शेत रस्ते, आरोग्य शिबीर, जॉब कार्ड, नवीन मतदार कार्ड बनविणे, सलोखा योजना, फळबाग लागवड, सिंचन साधने असे विविध योजनेसाठी या ठिकाणी तक्रार अर्ज स्वीकारण्यात येऊन त्या तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे. तरी सोनाळा मंडळातील सर्व शेतकरी व गावकरी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत पंचायत समिती संग्रामपूर स्तरावरील विविध योजनेचा लाभ पंचायत समिती मार्फत देण्यात येत आहे.घरकुल योजना,जन्म मृत्यू नोंदी,8 अ दुरुस्ती यासह विविध प्रकारच्या समस्या निपटारा करण्यात येणार आहे.तरी सोनाळा मंडळातील लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे.

माधव पायघन
गटविकास अधिकारी
पं.स.संग्रामपूर