सर्वसामान्य जनतेच्या समस्या तक्रारीचे निराकरण होणार ; तक्रारी असल्यास तहसील कार्यालयात 24 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावे; संग्रामपूर तहसील कार्यालयात 27 जानेवारी लोकशाही दिनाचे आयोजन – तहसिलदार प्रशांत पाटील…!

0
73

सर्वसामान्य जनतेच्या समस्या तक्रारीचे निराकरण होणार ; तक्रारी असल्यास तहसील कार्यालयात 24 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावे; संग्रामपूर तहसील कार्यालयात 27 जानेवारी लोकशाही दिनाचे आयोजन – तहसिलदार प्रशांत पाटील…!

संग्रामपूर – राज्य शासनाच्या आदेशानुसार तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार संग्रामपूर तहसील कार्यालय येथे 27 जानेवारी 2025 रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या शासकीय कामाबाबत लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावयाचा असल्यास विहित नमुन्यात २ प्रतीतील अर्ज तहसील कार्यालयात सादर करावा, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या तक्रारीचे निराकरण व्हावे. यासाठी संग्रामपूर तहसील कार्यालयात दि.27 जानेवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासन स्तरावरील जनतेची कामे होत नाहीत. अनेक तक्रारी असतात. त्याचा निपटारा व्हावा. व त्यांना न्याय मिळावा. यासाठी शासनाने लोकशाही दिनाचे आयोजन केलेले असून शासनाचे आदेशानुसार सर्व तालुका स्तरावर लोकशाही दिन आयोजन करण्यात येते.त्यानुसार ग्रामीण भागातील जनतेच्या विविध खाते व विभागाबाबत काही तक्रारी असतील त्यासाठी 27 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालय संग्रामपूर येथे लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे जनतेच्या काही तक्रारी असतील त्यांनी दोन प्रतीत तहसील कार्यालय संग्रामपूर येथे सात दिवसाच्या आत म्हणजेच 24 जानेवारी 2025 चे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष जमाबंदी विभागात सादर करावे. असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

【राज्य शासनाच्या नुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु मागील कित्येक दिवसापासून तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला नाही.संग्रामपूर तहसीलचे तहसिलदार प्रशांत पाटील यांचे लोकशाही दिनाचे पहिलाच कार्यक्रम होणार आहे हे विशेष…!】

【संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या शासकीय कामाबाबत तक्रारी असल्यास अर्ज सादर करावयासाठी विहित नमुन्यात 2 प्रतीतील अर्ज सात दिवसाच्या आत म्हणजेच 24 जानेवारी 2025 चे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तहसील कार्यालयात सादर करावा.

प्रशांत पाटील
तहसीलदार संग्रामपूर 】