स्व.श्रीराम कुटे गुरुजी फाऊंडेशनसाठी दिलीपभैय्या जैस्वाल यांच्याकडून 21 हजार रुपयांची धनादेशद्वारा मदत…!
दयालसिंग चव्हाण
संग्रामपूर – गरजू रुग्णांना माफक गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी. तसेच गरजूंना मदत व्हावी.गोरगरीब जनतेची सेवा करताना स्व. श्रीराम कुटे गुरजी फाऊंडेशनच्या सामाजीक उपक्रमाला सहकार्य म्हणून सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर, लाडणापूर येथील जगदंबा देवी मंदीर संस्थानचे अध्यक्ष दिलीप भैय्या जैस्वाल यांनी मदत स्वरूपात 21 हजार रुपयांचा धनादेश दिवाळीच्या दिवशी फाऊंडेशनच्या वतीने अनाथ बालकांची दिवाळी गोड केली, त्या कार्यक्रमात फाऊंडेशनचे अनाथांना कपडे व दिवाळीचा फराळ वाटप करुन दिवाळी साजरी केली.ह्यावेळी फाऊःडेशनचे अध्यक्ष डाँ काळपांडे यांना धनादेश सुपूर्द केला.
आरोग्याच्या क्षेत्रात रुग्णांना महागड्या उपचारासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. ही बाब लक्षात घेवू न गरजू रुग्णांना माफक गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी. तसेच गरजूंना मदत व्हावी. या उद्देशाने स्व.श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनची स्थापना केली आहे. गोरगरीब जनतेची सेवा करताना गरज असते लोकसहभागाची,रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी आपलाही सहभाग असावा. म्हणून श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनसाठी मदत स्वरुपात संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते लाडणापूर येथील जगदंबा देवी मंदीर संस्थानचे अध्यक्ष दिलीप भैय्या जैस्वाल यांनी 21 हजार रुपयांचा मदतीचा धनादेश लाडणापूर येथे दिवाळी दिवशी झालेल्या दिवाळीचे औचित्य़ साधुन श्रीराम कुटे गुरुजी फाऊडेशनच्या वतीने अनाथ बालकांची दिवाळी गोड केली जळगांव आणि संग्रामपूर तालुक्यतील 1 हजार 350 अनाथ बालकांची श्रीराम कुटे गुरुजी फाऊडेशनच्या वतीने दिवाळी आनंदात साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमात फाऊंडेशनचे अध्यक्ष डाँ काळपांडे यांना 21 हजाराचा धनादेश सुपूर्द केला.

