छत्रपती संभाजी राजेंचा रात्रीचा मुक्काम डोंगरी भागातील जंगलातील वसलेला आदिवासी पाड्यावर; पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या भोजनाचा आस्वाद,पाली आदिवासी नृत्याचा आंनद घेत समस्या घेतल्या जाणून..! आदिवासी बांधवांनी घेतला निर्धार…अब की बार प्रशांत डिक्कर आमदार..!
जळगाव जामोद येथील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिककर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपल्यानंतर रात्रीचा मुक्काम प्रशांत डिककर यांना सोबत घेत छत्रपती संभाजी राजे यांनी महाराष्ट्र – मध्यप्रदेशच्या सीमेवर डोंगरी भागातील जंगलातील वसलेला उमापूर येथील डावर वस्ती आदिवासी पाड्यावर केला.
छत्रपती संभाजी राजे यांनी आदिवासी बांधवांसोबत त्यांच्या पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या भोजनाचा आस्वाद घेतला. पाली आदिवासी नृत्याचा आनंद घेतला.वडिलधारी मंडळी व तरुणांच्या सोबत केलेल्या अनौपचारिक गप्पागोष्टींमधून आदिवासी जीवनशैली, विचारप्रणाली समजून घेता आली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. निसर्गविषयी अधिकची माहिती मिळाली. निसर्ग आणि मनुष्य एकरूप होऊन आनंदाने आणि समाधानाने राहू शकतो, याची जाणीव अधिक गडद झाली.असे राजे छत्रपती म्हणाले…
आदिवासी बांधवांनी केलेलं उत्साही स्वागत, आपुलकिने केलेलं आदरातिथ्य आणि त्यांच्या निर्मळ स्वभावाने मी अक्षरशः भारावून गेलो.इथला मुक्काम माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.असेही राजे म्हणाले….यावेळी त्यांचे सोबत प्रशांत डिककर यांचा सर्वांनी स्वागत करीत अब की बार सिर्फ प्रशांत डिककर आमदार असा निर्धार सर्व आदिवासी बांधवांनी घेतला..

